बदामी हलवा

लहानपणी सणासुदीला मिक्स मिठाईचा बाॅक्स बाबांना भेट मिळत असे. चाॅकलेट बर्फी, पेढे, काजुकतली, माहिमचा हलवा व बदामी हलवा असा रंगीबेरंगी मिक्स-मिठाईच्या बाॅक्स पाहुन मला खुप आनंद व्हायचा. त्यापैकी एक बदामी हलवा. आज त्याची रेसिपी देत आहे. मी बदामी हलवा काॅर्नफ्लोअर वापरून करते. त्यामुळे बदामी हलवा अजिबात चिकट किंवा चिवट होत नाही व सहज खायला येतो. नक्की करून पहा.

साहित्य:

  • १ वाटी काॅर्नफ्लोअर
  • २ वाट्या साखर
  • ३ वाट्या पाणी
  • १ टी. स्पुन लिंबाचा रस
  • १०-१२ काजुचे तुकडे
  • १/२ वाटी साजुक तुप
  • केशरी रंग व थोडे केशर (गरम करून कुटून घालणे)
  • रोझ पिंक -रोझ इसेन्स 
  • हिरवा रंग - आईस्क्रीम  इसेन्स 

(वरीलपैकी कोणताही एक रंग व इसेन्स तुमच्या आवडीनुसार वापरला  तरी चालेल.)

कृती:

१) काॅर्नफ्लोअर, साखर, पाणी, लिंबाचा रस, काजुचे तुकडे एकत्र करून गॅसवर ठेवा. मध्यम आंचेवर सतत ढवळत रहा.

२) मिश्रण घट्ट होत आले की, आवश्यकतेनुसार थोडे-थोडे तुप घाला. मिश्रण कडेने सुटू लागुन गोळा होत आला की, पुन्हा थोडे तुप सोडा.

३) तुप लावलेल्या ताटलीत तयार मिश्रण थापा व वड्या पाडा.



रेसिपी आवडली तर कमेंट व लाईक नक्की करा. 

Comments

Post a Comment

Popular Posts