नारळी भात/ Coconut Rice



'नारळी भात' हा पदार्थ विशेष करून श्रावण महिन्यात येणा-या नारळी पौर्णिमेला केला जातो. या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या, नारळाच्या वड्या असे नारळाचे गोड पदार्थ करून देवाला नेवैद्य दाखवतात. कोळी बांधव या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करतात. पावसाळ्यात कोळी बांधव मच्छीमारी करण्यासाठी आपल्या बोटी पाण्यात सोडत नाहीत. नारळी पौर्णिमा व राखी पौर्णिमा बहुतेक करून एकाच दिवशी असते. बहिण भावाच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधते व त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते व भाऊ तिचे  आयुष्यभर रक्षण करण्याची जबाबदारी घेतो. संपूर्ण भारतात राखी पौर्णिमा उत्साहाने साजरी केली जाते. माझ्या आईने मला नारळी भात करायला शिकवला आहे. आज माझ्या आईची, 'नारळी भाताची' रेसिपी शेअर करत आहे.

रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, मेंट व सबस्क्राईब  नक्की करा.

*सर्व्हिंग: ३-४ माणसांकरिता 
*करण्यासाठी लागणारा वेळ :३५-४० मिनिटे 

साहित्य:
  • १ कप बासमती तांदूळ
  • १ कप खोवलेला नारळ
  • दिड कप चिरलेला गुळ 
  • १/४ टीस्पून मीठ 
  • २ टेबलस्पून साजूक तूप
  • ४-५ लवंगा
  • २-३ बडी वेलची
  • १/४ टीस्पून वेलची पूड
  • १/४ कप काजूचे तुकडे
  • बदामाचे काप आवश्यकतेनुसार
कृती:

१) तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यातील पाणी काढून, तांदूळ १५-२० मिनिटे बाजूला ठेवून द्या. एका भांड्यात पाणी उकळत ठेवा  त्यात थोडे मीठ घाला. पाणी उकळल्यावर त्यात धुतलेले तांदूळ घाला व मोकळा भात शिजवून घ्या. भात शिजल्यावर त्यातील पाणी काढून भात एका ताटलीत पसरवून ठेवा व गार होऊ द्या. किंवा कुकरमध्ये मोकळा भात करा. 



२)  एका कढईत किंवा पातेल्यात १ टेबलस्पून साजूक तूप घाला. तुप तापल्यावर त्यात लवंगा व बडी वेलची घाला. लगेचच त्यात खोवलेला नारळ व गुळ घाला. गुळ पूर्ण विरघळल्यावर त्यात काजूचे तुकडे व वेलची पावडर घाला. 


३) मिश्रण उकळल्यावर त्यात, मोकळा भात घालून ढवळा. कढईवर झाकण ठेवून २-३ मिनिटे चांगली वाफ येऊ द्या. झाकण काढून त्यात थोडेसे साजूक तूप घालून, भात हलक्या हाताने ढवळा व पुन्हा एकदा झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ द्या. मिश्रण कोरडे होत आल्यावर, तयार भात एका भांड्यात किंवा बाउल मध्ये काढून घ्या.


) असा स्वादिष्ट नारळी-भात वर थोडे बदामाचे काप घालून सर्व्ह करा.


*गुळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात वापरा.
*मी अख्खा बासमती तांदूळ वापरला आहे. नारळी भात करतांना भात मोकळा असावा.(कुकरमध्ये मोकळा भात केला तरी चालेल. तुम्हाला येत असेल त्या पध्दतीने मोकळा भात करून घ्या).
*भात ढवळतांना हलक्या हाताने व उलथन्याने ढवळावा. त्यामुळे भाताची शितं मोडत नाहीत.

# Coconut Rice #


Shravan is a festive Marathi month. Different types of festivals are celebrated in this month and variety of traditional sweets are prepared. Coconut Rice (Traditional Sweet) is mainly prepared on the full moon day of 'Shravan'. This day is popularly known as Narali Purnima or Rakhi Purnima. Coconut Rice, Coconut Burfi (Vadi) or Coconut Karanji, etc. is prepared by using fresh Coconut and Jaggery. Narali purnima is mainly celebrated by the Fishermen. They worship the Sea and offer whole Coconut to the Sea. Rakhi festival is also celebrated with full enthusiasm all over India. Sister ties a thread called 'Rakhi' on her brother's wrist and pray for his long life and brother promises to protect her throughout the life. 
My mom always used to prepare Coconut Rice on Narali Purnima. I have learned this recipe from her and I am sharing the same with you. All ingredients are easily available at home. So let's see the recipe. 

If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog.

*Serving: 3-4 Persons
*Cooking time: 35-40 Minutes

Ingredients:
  • 1 cup Basmati Rice
  • 1 cup grated Coconut
  • 1.5 cup chopped Jaggery 
  • 1/4 tsp Salt
  • 2 tbsp Ghee
  • 4-5 Cloves
  • 2-3 Black Cardamom (Badi/Masala Elaichi)
  • 1/4 tsp Cardamom powder
  • 1/4 cup Cashew Nuts
  • Almond slices for garnishing
Method:

1) Wash the Rice, remove all water and keep it aside. Soak it for 15-20 minutes. In a large vessel keep the water for boiling. Add Salt and washed n soaked Rice in it and cook it. When the Rice is cooked, remove the excess water with the help of a strainer. Keep the cooked Rice in a plate and let it cool down. 
*Rice should be cooked well and all rice grains should be separated. 


2) Now heat pure Ghee in a wok or non stick pan. Add Black Cardamom (Badi elaichi) and Cloves. Now add grated Coconut and Jaggery in it. Mix it well until Jaggery gets dissolved completely. Add Cashew nuts and Cardamom powder in it.


3) Once the mixture gets boiled, add cooked Rice in it and mix it well. Cover it with a lid on medium  heat for 2-3 minutes and  remove the lid and stir it well. Add some Ghee in it. Again cover it with lid for 2-3 minute. When mixture gets dry, transfer the cooked Coconut Rice in a serving bowl.


4) Garnish the delicious Sweet Coconut Rice with Almond slices before serving. 


*You can use Jaggery as per your taste.
*For preparing Coconut Rice, I always use whole Basmati rice.  
*Do not overcook Rice. Use Flat spoon(wooden/iron Dosa turner) to stir rice so that Rice grains would not get broken.

Comments

Popular Posts