हेल्दी प्रोटीन चाट/ Healthy Protein chat

हेल्दी प्रोटीन चाट

साहित्य:

  • १ वाटी भिजवलेले काबूली चणे
  • १ वाटी भिजवलेला राजमा
  • १ वाटी भिजवलेले शेंगदाणे
  • १ गाजर किसलेले/ चिरलेले 
  • १ टोमॅटो चिरलेला
  • १ कांदा बारीक चिरलेला
  • १ काकडीचे मध्यम चौकोनी तुकडे
  • १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ हिरवी मिरची बारीक चिरलेली
  • १ चमचा चाट मसाला
  • थोडेसे काळे मीठ
  • थोडाशी पुदिन्याची पाने 

कृती:

१) काबूली चणे, राजमा व शेंगदाण्यात पुरेसे पाणी व थोडेसे मीठ घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर त्यातील पाणी काढून टाका.

२) एका भांड्यात शिजवलेले काबूली चणे, राजमा, शेंगदाणे घ्या. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, किसलेले गाजर,  हिरव्या मिरचीचेे तुकडे, चाट मसाला, काळे मीठ घालून मिक्स करा. सर्व्ह करतांना त्यात थोडी चिरलेली कोथिंबीर व पुदिना घाला. ( आवडत असल्यास कोथिंबीर, आलं, मिरची व पुदिन्याची चटणी वाटून १-२ चमचे घाला.)



Comments

Popular Posts