पेढ्याची पोळी

साहित्य:
  • दिड ते दोन वाटी गव्हाचे पीठ
  • चिमुटभर मीठ
  • ३-४ पेढे
  • थोडेसे तेल
  • साजूक तूप जरुरीनुसार
कृती:

१) गव्हाचे पीठात थोडसं मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक थोडीशी सैलसर भिजवून घ्या. थोडेसे तेल लावून कणिक मळून घ्या. 


२) तयार पेढ्याचे तुकडे करून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या किंवा हाताने मोकळे करून गुठळ्या मोडून घ्या.

३) भिजवलेल्या कणिकेचा लहान गोळा घेऊन त्याची खोलगट वाटी करून त्यात पेढ्याचे सारण भरा. हलक्या हाताने पोळी लाटा व दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर पोळी भाजून घ्या. पोळीवर साजूक तूप सोडून पोळी भाजा.

४) गरमागरम 
पेढ्याची पोळी सर्व्ह करा. वरील साहित्य घेऊन ३-४ पोळ्या तयार होतात.




Comments

Popular Posts