पालकाची ताकातली भाजी

साहित्य:
  • पालकाची १ मध्यम जुडी 
  • २-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे 
  • १०-१२ लसुण पाकळ्या 
  • २ टेबलस्पून चणाडाळीचे पीठ 
  • २-३ टीस्पून साखर 
  • ३ वाट्या थोडंसं आंबट ताक
  • ३-४ टेबलस्पून तेल 
  • १ टेबलस्पून चणाडाळ व २ टेबलस्पून शेंगदाणे भिजवलेले (ऐच्छिक)
  • चवीनुसार मीठ 

फोडणीसाठी :


१/४ मोहरी, १/४ चमचा जिरं, १/४ चमचा हळद व चिमुटभर हिंग, १ लाल मिरची

कृती:

१) पालक धुवून बारीक चिरून घ्या. एका भांड्यात १ टेबलस्पून  तेल तापवून त्यात चिरलेला पालक २-३ मिनिटे परतुन घ्या. १/२ वाटी पाणी व हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून पालक कुकरमध्ये शिजवून घ्या. 
(भिजवलेली चणाडाळ व शेंगदाणे पालक शिजवतांना त्यात शिजवून घ्या).

२) कुकर गार झाल्यावर, शिजवलेला पालक घेेेऊन त्यात चणाडाळीचे पीठ घालून भाजी चांगली घोटून घ्या. त्यात ताक, साखर, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून मिश्रण मध्यम आंचेवर ५-७ मिनिटे उकळु द्या. भाजी थोडी दाटसरच ठेवा.

३) एका कढईत २-३ टेबलस्पून तेल तापवून त्यात मोहरी, जिरं, हळद, हिंग, लसुण पाकळ्या व लाल मिरचीची खमंग फोडणी करून घ्या. तयार फोडणी पालकाच्या भाजीत घालून भाजी २-३ मिनिटे उकळा. 

४) गरम-गरम भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.



Comments