कैरी-कांदा चटणी/Kairi- Kanda Chutney
मार्च महिन्यात बाजारात कैऱ्या मिळू लागतात. कैरीचे सार, कैरीचं पन्हे, कैरीचे लोणचं, कैरीची चटणी, कैरीचा साखरांबा असे विविध प्रकार केले जातात. कैरी कांदा चटणी हा महाराष्ट्रात केला जाणारा पारंपारिक प्रकार आहे. कैरी बरोबर किसलेला कांदा, प्रमाणात गुळ, तिखट व चवीनुसार मीठ व फोडणी करून तोंडीलावण्यासाठी केला जाणारा हा एक झटपट प्रकार आहे. आंबट गोड व तिखट अश्या मिश्र चवींची चटकदार चटणी तुम्हाला नक्कीच आवडेल. साहित्यही सहजच उपलब्ध असते. पाहूया कैरी कांदा चटणीची रेसिपी.
रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट नक्की करा.
साहित्य:
- १ मध्यम कैरी (किसलेली)
- १ मध्यम कांदा (किसलेला)
- १ टेबलस्पून लाल तिखट
- २ टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ
फोडणीसाठी:-
- २-३ टेबलस्पून तेल
- १/४ चमचा मोहरी
- चिमुटभर हिंग
- मीठ चवीनुसार
१) एका भांड्यात किसलेली कैरी व किसलेला कांदा घ्या. त्यात बारीक चिरलेला गूळ, लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
२) एका छोट्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी व हिंग घालून फोडणी करा. तयार फोडणी वरील मिश्रणात घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
३) पोळी, भाकरी किंवा वरण-भाता बरोबर सर्व्ह करा.
*आपल्या आवडीनुसार तिखट व गुळ कमी जास्त प्रमाणात वापरा.
# Raw Mango Chutney #
Raw Mango Chutney is a traditional side dish of Maharashtra served with meal. Raw Mango season starts from the month of March and it is easily available in the market. Raw mangoes are used for preparing Pickles, Kairi Panhe (Sharbat), Curries and different types of Chutneys. Raw Mango chutney with Onion tastes yummy. Add grated Raw Mango & Onion, Jaggery, sprinkled with Red Chili Powder with tempering and Salt as per taste. You will definitely love it's tangy, spicy and sweet taste. Let's see this simple and easy recipe.
If you like the recipe, please don't forget to like, comment, share and subscribe my blog.
Ingredients:
- 1 medium sized Raw Mango (grated)
- 1 medium sized Onion (grated)
- 1 tbsp Red Chili Powder
- 2 tbsp Jaggery
- 2-3 tbsp Oil
- 1/4 tsp Mustard Seeds
- A pinch of Asafoatida
- Salt as per taste
Method:
1) In a large mixing bowl, add grated Onion & Raw Mango, Red Chili Powder, Jaggery and Salt as per taste.
2) Heat oil in a pan and add Mustard seeds. When it sputters, add Asafoetida in it. Now, add tempering into the bowl and mix it well .
3) Serve it with Roti/Bhakari and Dal-Rice.
*You can add more Red chili powder and Jaggery.
Comments
Post a Comment