कच्च्या केळ्याचे कटलेट / Raw Banana Cutlet

कच्च केळं हे पिकलेल्या केळ्याइतकंच पौष्टिक व उपयोगी असतं.भारतीय स्वयंपाक घरात कच्च्या केळ्याचा वापर भाजी, भजी, वेफर्स, कोफ्ते, पराठे, व कटलेट करण्यासाठी होतो. कच्च्या केळ्याचे काप उन्हात वाळवून, त्यापासून केळ्याचे पीठ करून ठेवता येते व ते नंतर कधीही वापरता येते. उपासाकरिता केळ्याचे पीठ वापरून थालीपीठ, केळ्याची लापशी व उपासाचे पदार्थ करता येतात तसेच कच्च्या केळ्याचे पीठ वापरून आपण त्यापासून प्रोटीन पावडर सुध्दा करू शकतो. कच्ची केळी ही बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात. तसेच विकत घ्यायची म्हटली तरी ती खूप महाग नसतात. कच्चं केळं हे आपल्या दैनंदिन आहारात सहज समाविष्ट करता येणारं आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर अन्न आहे. कच्च्या केळ्यात स्टार्च, फायबर, पोटॅशियम, विटामिन C सारखे पोषक घटक असतात. त्यातील नैसर्गिक पोषक घटक पचनसंस्था मजबूत ठेवतात, रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात असे माझ्या वाचनात आले आहे. त्यामुळे आपल्या आहारात या हिरव्या खजिन्याचा समावेश नक्की करा. हे आरोग्यदायी व अनेक गुणांनी भरपूर आणि स्वादिष्ट असे केळ्याचे पदार्थ कुटुंबातील सगळ्या वयोगटाच्या सदस्यांना फायदेशीर असतात. पाहूया कच्च्या केळ्याचे कटलेट.


सर्व्हिंग : १४-१५ नग
लागणारा वेळ : ३५-४० मिनिटे

साहित्य :
  • ३-४ कच्ची केळी
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • १/२ ते १" आलं
  • १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ३-४ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • १ टीस्पून चाट मसाला
  • १ टीस्पून चिली फ्लेक्स
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून धने पावडर
  • १/२ टीस्पून जिरे पावडर
  • चवीनुसार मीठ 
  • थोडेसे पाणी

कृती:

१) प्रथम केळ्याचे देठ व खालचा भाग कापून कुकरमध्ये ३-४ शिट्या करून, केळी उकडून घ्यावीत.


२) कुकर गार झाल्यावर, त्यातील केळ्याचे साल काढून घ्यावे. एका परातीत सालं काढलेली केळी घेऊन, काट्याने किंवा मॅशरने केळी मॅश करावीत. त्यामध्ये आलं मिरचीची पेस्ट,चाट मसाला, चिली फ्लेक्स, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, कॉर्नफ्लोअर, धने-जिरे पावडर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करावे.


३) तयार मिश्रणात आवश्यक वाटल्यास थोडेसे पाणी घालून मिश्रण सारखे करून घ्यावे. 


४) तयार मिश्रणाचे आवडीप्रमाणे लांबट किंवा गोलाकार कटलेट करून घ्यावेत.


५) तयार कटलेट तव्यावरती तेल सोडून शॅलो फ्राय करून घ्यावे. 


६) पुदिन्याच्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.


# Raw Banana Cutlet

Raw banana is just as nutritious and useful as ripened banana. In Indian kitchens, raw bananas are commonly used to prepare dishes such as curries, fritters, wafers, koftas, parathas, and cutlets. Slices of raw banana can also be sun-dried and ground into flour, which can be stored and used later. This flour is especially useful during fasting days to make dishes like thalipeeth (flatbread), lapsi (porridge), or other such recipes. Protein powder can also be made from this flour.

Raw bananas are easily available in the market and are quite affordable. They can be conveniently included in our daily diet and are highly beneficial for our health. Raw bananas are rich in nutrients like starch, fiber, potassium, and vitamin C. These natural nutrients help strengthen the digestive system, regulate blood pressure, and provide long-lasting energy to the body, according to what I’ve read. Therefore, be sure to include this green treasure in your diet. These healthy, nutrient-rich and delicious banana-based dishes are suitable for all age groups in the family.

Now let's take a look at Raw Banana Cutlet.

Serving : 14-15 pieces

Preparation time : 35-40 minutes

Ingredients:

  • 3–4 Raw Bananas
  • 3–4 Green Chilies
  • ½ to 1 inch piece of Ginger
  • ½ bowl finely chopped Coriander leaves
  • 3–4 tablespoons Corn flour
  • 1 teaspoon Chat Masala
  • 1 teaspoon Chili flakes
  • ½ teaspoon Turmeric powder
  • 1 teaspoon Coriander powder
  • ½ teaspoon Cumin powder
  • Salt to taste
  • Water

Method:

1) Cut off the top and bottom of the bananas and pressure cook them for 3–4 whistles (i.e. until soft).


2) Once the cooker cools down, peel the bananas. In a plate take peel bananas, mash them well using a fork or masher. 
Add ginger–chili paste, chat masala, chili flakes, turmeric, finely chopped coriander, corn flour, coriander powder, cumin powder, and salt. 


3) Mix everything well to form a dough. If needed, add a little water to adjust the consistency. 


4) 
Shape the mixture into long or round cutlets as per your preference.


5) Shallow fry the prepared cutlets on a pan with a little oil until golden brown.


6) Serve hot Cutlets with mint chutney or tomato ketchup.


Comments

  1. Delicious 😋

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान आणि सोप्पी रेसिपी. उपासला चालणारी.. 👍🏻

      Delete

Post a Comment

Popular Posts