ज्वारीचे थालीपीठ /Sorghum Thalipeeth (Flatbread)

#  ज्वारीचे थालीपीठ  #

महाराष्ट्रात सोलापूर जिल्हयात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तिथे मिळणारी ज्वारीची कडक भाकरी प्रसिद्ध आहे. ज्वारीचा वापर भाकरी, लाह्या, पापड, आंबील, उकडपेंडी व थालीपीठासारखे पदार्थ  करण्यासाठी केला जातो. हल्ली शहरी जीवनाच्या धावपळीमध्ये आपल्या आहारात पोळी खाण्याचे प्रमाण वाढले आहे. भाकरी खाण्याचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेपेक्षा शहरी भागामध्ये कमी आहे. ज्वारी पचनास सोपी असून आरोग्यास गुणकारी  लाभदायक असते. ज्वारीमध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ, शर्करा व खनिजद्रव्ये अधिक प्रमाणात आढळतात असे माझ्या वाचनात आले आहे. अश्या या गुणकारी ज्वारीचे सेवन आपण आपल्या आहारात नक्कीच वाढवले पाहिजे नाही का? भाकरी करण्यापेक्षा ज्वारीचे थालीपीठ हा एक उत्तम प्रकार असून कमी वेळात तयार होतो . ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ खूप चविष्ट लागते व मला अतिशय आवडते. भुक लागली की, माझी आई मला ते पटकन करून द्यायची. 

'गरम-गरम', 'चुरचुरीत' असे थालीपीठ आणि त्याबरोबर दही, लोणचं आणि घरचं कणीदार तूप असायचं. माझी आई उत्तम सुगरण होती. ती नेहमीच वेगवेगळे पौष्टिक पदार्थ करायची. विशेष म्हणजे अगदी कमीत कमी साहित्यात पण उत्तम चव व चांगली पोषण मूल्ये असणारा पदार्थ करणं ही तिची खासियतच होती. पाहूया साधी व सोपी अशी अशी माझ्या आईने शिकवलेली रेसिपी.

सर्व्हिंग: ४ माणसांकरिता 
लागणारा वेळ: २०-२५ मिनिटे  

साहित्य:
  • २ कप ज्वारीचे पीठ
  • १/२ कप चिरलेला कांदा
  • १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • १/४ कप चिरलेली कोथिंबीर
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून हळद
  • १/४ टीस्पून हिंग
  • १ टीस्पून ओवा
  • २ टीस्पून तीळ
  • १ टेबलस्पून जवस
  • मीठ चवीनुसार

कृती :

१) ज्वारीच्या पीठात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, हळद, हिंग, लाल तिखट, जवस, तीळ, ओवा व चवीनुसार मीठ घालून भाकरीप्रमाणे पीठ भिजवून घ्या. तयार पीठाचे चार समान भाग करून घ्या.


२) बटर पेपरचा एक चौकोनी तुकडा कापून ठेवा. एका ताटलीत बटरपेपर किंवा प्लास्टिकचा पेपरला थोडे तेल लावून घ्या. (केळीचे पानं वापरले तरी चालेल).


२) मध्यम आंचेवर लोखंडी तवा तापत ठेवा. तेल लावून ठेवलेल्या बटर पेपरवर किंवा केळीच्या पानावर भिजवलेला तयार गोळा घेऊन, त्यावर एकसारखा गोलाकारात थापा व मधोमध ४-५ भोकं पाडून घ्या. थापलेले थालीपीठ तव्यावर टाकून थोडे तेल सोडा व त्यावर झाकण ठेवा. २-३ मिनिटांनी झाकण काढून थालीपीठ उलटून पुन्हा थोडे तेल सोडा व थालीपीठ दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर शेकून घ्या.



४) गरमागरम ज्वारीचे थालीपीठ, लोणचं, दही व तूपाबरोबर सर्व्ह करा.


# Sorghum Flour Thalipeeth (Flatbread) #

Sorghum Flatbread is one of my favourite dishes for breakfast. My mom used to quickly prepare it for me in my childhood days. Ocassionally she would also add some flaxseeds and sesame seeds in it. She was an expert cook. These days, kids do not eat certain food items easily and thus we parents have to trick them to eat those food items. Sorghum grains are very healthy. In rural areas, people make different varieties with sorghum such as Bhakari, Thalipeeth, Ukadpendi, Papad, etc. but in urban areas, unfortunately due to the lack of time it is missing. I think, everyone should eat healthy grains like Sorghum at least once a week. It is easy to digest and healthy too. 

The ingredients required for preparing Sorghum Flatbread are easily available at our home. Let's see the recipe of Sorghum Flatbread. 

Serving : 4 
Time Required : 20-25 minutes

Ingredients:
  • 2 cup Sorghum flour
  • 1/2 cup chopped Onion
  • 1-2 chopped Green chillies
  • 1/4 cup chopped Coriander 
  • 1 tsp Red chilli powder
  • 1/2 tsp Turmeric powder
  • 1/4 tsp Asafoetida
  • 1 tsp Carom seeds
  • 2 tsp Sesame seeds
  • 1 tsp Flax seeds
  • Salt as per taste
Method
:

1) In a large mixing bowl add sorghum flour, chopped onion, green chilies, coriander leaves , red chilli powder, turmeric powder, asafoetida , carom seeds, sesame seeds, flax seeds, Add salt as per taste, mix it well and make a dough. Make four equal portions of the dough. 

2) Heat iron skillet or tava on medium flame. Cut butter paper in a square shape, grease it with some Oil and keep it aside in a plate. Now take one portion of dough and spread it equally on the butter paper in a circular shape.  


3) Place it gently on skillet/tawa and smear some oil on it. Cover it with a lid for 2-3 minutes. When one side is cooked flip it upside down and smear some more oil. Cook both the sides till they turn golden brown.



4) Serve delicious Sorghum Thalipeeth with Ghee, Curd and Mango Pickle.


Comments

  1. वा मस्तच. सुंदर, Photo बघूनच पदार्थची चव कळली, छान पदार्थ आहे हा. पौष्टिक आणी चविष्ट.. म्हंटलं तर नाश्त्याला पण होतो. आणी म्हंटले तर जेवणाला पण

    ReplyDelete
  2. मस्तच, खूप पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी...😋👌👌👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts