कढी गोळे/ Kadhi-Gole
कढी गोळे, हा महाराष्ट्रात केला जाणारा एक पारंपारिक प्रकार आहे. यामधे ताकाची कढी करून त्यात भिजवलेल्या चणाडाळीचे गोळे करून कढीमध्ये सोडतात व त्याबरोबर मस्त अशी लसूण घालून केलेली तिखट व खमंग फोडणी आणि चिरलेला कच्चा कांदा घालून ही सर्व्ह केली जाते. या पाककृतीसाठी लागणारे सगळे साहित्य घरात सहजच उपलब्ध असते व अगदी कमी वेळेत तयार होऊ शकते. हा प्रकार पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर खाता येतो. चला तर पाहूया अशी साधी सोपी आणि पटकन होणारी चविष्ट कढी-गोळे करायची रेसिपी.
रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
*सर्व्हिंग: ४ माणसांकरिता
*करण्यासाठी लागणारा वेळ: ३०-४० मिनिटे
कढी करण्यासाठी लागणारे साहित्य:
- ४ कप ताक
- १ टेबलस्पून चणाडाळीचे पीठ
- १" आलं (किसलेले)
- ३-४ लसूण पाकळ्या (ठेचलेल्या)
- १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
- ७-८ कडिपत्याची पानं
- २ टेबलस्पून तेल किंवा तूप
- १/२ टीस्पून मोहरी
- १/४ टीस्पून जिरं
- १/४ टीस्पून हळद
- १/४ टीस्पून हिंग
- २-३ टीस्पून साखर
- मीठ चवीनुसार
गोळे करण्यासाठी लागणारे साहित्य:
- १ कप चणाडाळ
- ४-५ हिरव्या मिरच्या
- ५-६ लसूण पाकळ्या
- मीठ चवीनुसार
कढी करण्याची कृती:
१) एका पातेल्यात ताक काढून घ्या. चणाडाळीच्या पीठात थोडेसे पाणी घालून पेस्ट करून घ्या. तयार पेस्ट ताकामध्ये घालून ताक ढवळा. त्यात किसलेलं आलं, साखर व चवीनुसार मीठ घालून ताक उकळायला ठेवा.
२) एका छोट्या कढईत तेल/तूप तापत ठेवा. तेल तापले की, त्यात ठेचलेल्या २-३ लसणाच्या पाकळ्या, मोहरी, जिरं, हळद, हिंग, हिरव्या मिरच्यांचे तुकडे व कडिपत्याची पानं घालून फोडणी करून घ्या. तयार फोडणी ताकामध्ये घालून ताक ढवळा. तयार कढीचे मिश्रण मध्यम आंचेवर उकळत ठेवा.
गोळे करण्याची कृती:
चणाडाळ धुवून, २-३ तास पाण्यात भिजत ठेवा. चणाडाळ भिजल्यावर त्यातील पाणी काढून घ्या. त्यात हिरव्या मिरच्या व लसूण पाकळ्या घालून मिक्सरमध्ये भरड वाटून घ्या. वाटलेली डाळ एका भांड्यात काढून घ्या. चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
कढी-गोळे करण्याची कृती:
मध्यम आंचेवर कढी चांगली उकळू द्या. वाटलेल्या चणाडाळीच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ऊकळणा-या कढीमध्ये सावकाश सोडा. जिथे उकळी येते त्या ठिकाणी चणाडाळीचे गोळे सोडा. सगळ्या मिश्रणाचे गोळे कढीमध्ये सावकाश सोडून घ्या. ३-४ मिनिटांनी कढीमध्ये गोळे तरंगू लागल्यावर २-३ मिनिटे कढी छान उकळून घ्या व गोळे शिजवून घ्या.
सर्व्ह करण्यासाठी:
१) एका कढईत तेल तापत ठेवा त्यात १०-१२ लसूण पाकळ्या व लाल तिखट घालून खमंग फोडणी करून घ्या.
२) एक मध्यम कांदा व थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
३) एका बाऊल मध्ये कढी-गोळे त्यावर लसणाची खमंग फोडणी चिरलेला कांदा व कोथिंबीर घालून पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.
# Kadhi-Gole
KADHI-GOLE is a traditional curry recipe of Vidarbha region of Maharashtra. Buttermilk is used for preparing Kadhi and split Chick Pea is used for preparing Gole. Kadhi Gole is served with Roti, Bhakri or even with Rice. Let's see the simple & tasty recipe of Kadhi-Gole.
If you like the recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog.
*Serving: 4 Persons
*Preparation time: 30-40 minutes
Ingredients for preparing Kadhi
Ingredients for preparing Kadhi
- 4 cups Buttermilk
- 1 tbsp Besan
- 1" Ginger (grated)
- 3-4 Garlic cloves (crushed)
- 1-2 Green Chilies (chopped)
- 7-8 Curry leaves
- 2 tbsp Oil or Ghee
- 1/2 tsp Mustard seeds
- 1/2 tsp Cumin seeds
- 1/4 tsp Turmeric powder
- 1/4 tsp Asafoetida
- 2-3 tsp Sugar
- Salt as per taste
- 1 cup Split Chick Pea (Chana Dal)
- 4-5 Green Chilies
- 5-6 Garlic Cloves
- Salt as per taste
1) Add some water in Besan and make a smooth paste. Pour Buttermilk in a large vessel. Mix the Besan paste in it and stir it well. Add Grated Ginger, Sugar and Salt as per taste. Keep it for boiling on medium flame.
2) Heat Oil/ Ghee in a small pan and add Mustard seeds in it. When it starts to sputter, add crushed Garlic, Chopped Green Chilies, Curry leaves, Cumin seeds, Turmeric powder and Asafoetida in it. Add this tempering in Buttermilk mixture and mix it well. Keep Kadhi Mixture on medium flame for boiling.
Method For Preparing Gole (Chana Dal Balls):
Wash Spilt Chick Pea (Chana Dal) in sufficient water and soak it for 2-3 hours. Then drain the water from Chana Dal. Now coarsely grind Chana Dal with Green chilies and Garlic cloves in the mixer. Keep it in a bowl and add Salt as per taste in it.
Method for preparing Kadhi Gole:
Boil Kadhi on medium flame. Now take a small portion of ground mixture of Chana Dal. Make a ball of this mixture and drop it gently into the boiling buttermilk mixture i.e. Kadhi. Drop the balls in Kadhi at the place where bubbles appear. It helps to cook Chana Dal balls, well. Drop the balls of the entire mixture in it. After these balls start floating on the Kadhi mixture, boil it for 2-3 minutes and cook the Chana Dal balls. And here your Kadhi-Gole recipe is ready to serve.
For Garnishing:
1) Heat some Oil in a small pan and add Mustard seeds in it. When it sputters, add Garlic cloves and Red chilli powder in it. Keep it aside.
2) Chop Onion and Coriander leaves
Method For Serving Kadhi Gole:
Take a bowl and pour Kadhi Gole in it. Now add some tempering, chopped Coriander leaves and Onion on it. Serve it with Roti, Bhakri or Rice.
1) Heat some Oil in a small pan and add Mustard seeds in it. When it sputters, add Garlic cloves and Red chilli powder in it. Keep it aside.
2) Chop Onion and Coriander leaves
Method For Serving Kadhi Gole:
Take a bowl and pour Kadhi Gole in it. Now add some tempering, chopped Coriander leaves and Onion on it. Serve it with Roti, Bhakri or Rice.
खूप छान पद्धतीने सविस्तर पाककृती सांगणारे blogs बोटावर मोजता येतील एवढेच आहेत. त्यात तुझा हा blog आहे.. मस्त !! अशाच रेसिपी मिळोत आम्हाला. असाच blog वृद्धिंगत होवो 👌👌👌👍👍👍👍
ReplyDelete