चटकदार हिरव्या चिंचेचा ठेचा
बाजारात हिरव्या चिंचा पाहून तोंडाला पाणी सुटले मनोमन आईच्या हातच्या ठेच्याची आठवण झाली आणि काही मिनिटांत चिंचेचा वाटा घेऊन पिशवीत भरला. आता चिंच तर घेतली पण ठेचा कसा करायचा हे आठवतच नव्हतं आणि सांगायला आई कुठे आहे आता? मग आई नाही तर मावशी आहे की. तिला लगेच फोन करून रेसिपी विचारली आणि तिने देखील मोठ्या उत्साहात सांगितली. विस्मृतीत गेलेला चिंचेचा ठेचा पुन्हा केला गेला आणि फस्त ही झाला. जेवतांना एक चटकदार तोंडीलावणे म्हणून छान लागते. चिंचेचा तयार ठेचा बरेच दिवस फ्रिझमध्ये टिकतो. अश्या या आंबट-गोड चटकदार ठेच्याची रेसिपी पाहूया.
साहित्य:
- १ ते दिड वाटी हिरवी चिंच
- ६-८ हिरव्या मिरच्या
- २-३ टेबलस्पून तेल
- १/२ चमचा मोहरी
- १/२ चमचा हळद
- १/४ चमचा हिंग पावडर
- १/२ चमचा मेथी दाणे किंवा मेथी पावडर
- १ चमचा गुळ किंवा गुळ पावडर
कृती:
१) प्रथम चिंच स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी. त्याचे तुकडे करावेत शिरा असतील त्या काढून घ्याव्यात.
२) मिक्सरवर चिंचा भरड वाटून घ्याव्यात. त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या वाटाव्यात. वाटलेली चिंच व मिरच्या एकत्र कराव्यात.
३) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हळद, हिंग व मेथी पावडर / मेथीदाणे घालून खमंग फोडणी करून घ्यावी. फोडणी गार करून घ्यावी.
४) चिंचेच्या मिश्रणात तयार फोडणी व मीठ घालून मिश्रण एकत्र करावे. त्यात थोडसा चिरलेला गूळ किंवा गूळ पावडर घालून मिश्रण एकत्र करावे.
५) भाकरी, पोळी बरोबर सर्व्ह करा.
# Raw Tamarind Thecha
In Maharashtra, raw tamarind is used to prepare spicy & tangy Tamarind Thecha as a side dish. During my childhood, my Mom used to prepare this Thecha many a times. However, I didn't know the recipe. So I decided to seek guidance from my Mausi, who is also an expert in cooking. Let's see the ingredients, which are normally available at our home easily.
Ingredients:
- 2 bowls Raw Tamarind
- 7-8 Green Chilies
- 2-3 tbsp Oil
- 1 tsp Mustard seeds
- 1/2 tspTurmeric powder
- 1/2 tsp Fenugreek seeds/ Powder
- 1/4 tsp Asafoetida
- 1 tsp Jaggery/ Jaggery powder
- Salt as per taste
Method:
1) Wash Tamarind with water and then dry it with a piece of cloth.
2) Make medium size pieces and remove the thread which is there with the tamarinds. Grind these pieces coarsely along with some Green Chilies in mixer and mix it well.
3) Heat some oil in a pan and add mustard seeds it. When it sputters, add turmeric powder, fenugreek seeds/powder & asafoetida in it. Put off the flame. Allow it to cool down.
4) Now add the tempering, jaggery powder and some salt in the tamarind mixture and mix it well.
5) Serve spicy and tangy "Tamarind Thecha" for lunch or dinner.
*You can store it in the fridge for many days.
Wow, mastch.
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deleteजीभेला पाणी सुटलं, नक्कीच करावयास हवा, धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deleteखूपच छान लागतो...
ReplyDelete