वाटली डाळ/Watali Dal

 वाटली डाळ महाराष्ट्रातील एक पारंपारिक प्रकार आहे. माझ्या माहेरी, गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पाला वाटल्या डाळीची शिदोरी दिली जाते. तर माझ्या सासरी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीला वाटली डाळ व गोडाचा शिरा करायची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे आणि आम्ही देखील ती परंपरा आवर्जून जपतो. सणासुदीला नैवेद्य म्हणून कांदा लसूण न वापरता वाटली डाळ केली जाते. एरव्ही मात्र कांदा लसूण घालून केली जाते. कांदा व लसूण न वापरता केलेली वाटली डाळ सुध्दा चविष्टच लागते. भिजवलेली चणाडाळ भरड वाटून, वाटली डाळ केली जाते. चणाडाळ वापरून केलेला ह्या पदार्थामधून प्रोटीन मिळते. अगदी १५-२० मिनिटांत पौष्टिक पदार्थ तयार होतो. नाश्त्यासाठी एक उत्तम पदार्थ असून एका प्लेटमध्ये पोट छान भरते. 

*सर्व्हिंग: ३-४ माणसांकरिता 
*करण्यासाठी लागणारा वेळ : २५-३० मिनिटं 

साहित्य:

  • एक ते दिड कप चणाडाळ
  • १ मध्यम कांदा
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • १" आलं
  • ४-५ लसूण पाकळ्या 
  • ७-८ कढीपत्याची पानं 
  • १/४ कप बारिक चिरलेली कोथिंबीर
  • १/४ कप खोवलेला नारळ
  • १/२ लिंबाचा रस
  • १ टीस्पून साखर
  • मीठ चवीनुसार

फोडणीकरिता:

  • ३-४ टेबलस्पून तेल
  • १/४ टीस्पून मोहरी
  • १/४ टीस्पून हळद
  • १/४ टीस्पून हिंग

कृती:

१) चणाडाळ स्वच्छ धुवून २-३ तास भिजवून घ्या. चणाडाळीतील पाणी काढून मिक्सरमध्ये भरड वाटून घ्या.
 आलं लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घ्या व कांदा बारीक चिरून घ्या.


) एका कढईत तेल तापत ठेवा. मोहरी, हळद, हिंग व कढीपत्ता घालून फोडणी करून घ्या. त्यात आलं, लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून परतून घ्या. बारीक चिरलेला कांदा घालून २-३ मिनिटे परतून घ्या. कांदा लालसर झाल्यावर त्यात भरड वाटलेली चणाडाळ घालून परतून घ्या. त्यात साखर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. मिश्रणावर झाकण ठेवून २-३ मिनिटे चांगली वाफ येऊ द्या. झाकण काढून मिश्रण ढवळून घ्या. व पुन्हा झाकण ठेवून वाफ येऊ द्या. चणाडाळ शिजल्यावर त्यात लिंबाचा रस घाला व मिश्रण एकत्र करून घ्या.




३) वाटली डाळ सर्व्ह करतांना खोवलेला नारळ व चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 


Watali Dal #


Watali Dal is a traditional Maharashtrian snacks or breakfast recipe. It is our traditional dish which is usually prepared on the day of Ganapati immersion at my mother's place. On the first day of Diwali, we prepare Watali Dal and Sweet Sheera at my place. Watali Dal is a protein rich breakfast. All ingredients are easily available at home. It can be prepared in a very less amount of time. So let's see the easy and tasty traditional recipe of Watali Dal.

*Serving: 3-4 persons
*Cooking time: 20-25 minutes

Ingredients:
  • 1 cup/ 1.5 cup Split Chick Pea
  • 1 medium sized Onion
  • 2-3 Green Chilies
  • 1" Ginger
  • 4-5 Garlic cloves 
  • 7-8 Curry leaves
  • 1 tbsp Lemon juice
  • Salt as per taste
  • 1 tsp Sugar
  • 1/4 cup chopped Coriander leaves
  • 1/4 cup Grated Coconut
For tempering:
  • 3-4 tbsp Oil
  • 1/4 tsp Mustard seeds
  • 1/4 tsp Turmeric powder
  • 1/4 tsp Asafoetida 
Method:

1) Wash and soak Split Chick Pea in sufficient water for 2-3 hours. Then remove water and coarsely grind it in mixer. Coarsely grind Green Chills, Ginger & Garlic and make a paste. Chop the Onion into medium sized pieces.


2) Heat Oil in a pan or Kadhai and add Mustard seeds, Turmeric powder, Asafoetida and Curry leaves in it. Now add Chilli, Ginger-Garlic paste and chopped Onion in it. Stir it for 2-3 minutes. Add coarsely ground Split Chick Pea in it and mix it well. Cover it with a lid for 3-4 minutes. Stir it once again and cover it with a lid for another 2-3 minutes or until Chanadal gets cooked. Now add lemon juice in it. Again mix it well.




3) Garnish it with grated Coconut and chopped Coriander leaves and serve it hot.

Comments

Post a Comment

Popular Posts