पेरूचं लोणचं /Guava pickle
बाजारात सध्या बरेच पेरू मिळतात. पेरूच्या फोडी करून त्यावर तिखट-मीठ घालून पेरू खातांना शाळेतील मधली सुट्टी नक्कीच आठवते. मधल्या सुट्टीत पटकन शाळेच्या बाहेर टोपली घेऊन बसलेल्या आजीकडून एक-दोन रूपयाचे पिकलेले पेरू विकत घ्यायचो आणि त्यावर तिखट-मीठ घालून आम्ही मैत्रिणी मिळून पेरू फस्त करायचो.
सिझनमध्ये माझी आई पेरूचं लोणचं करायची. बाजारात सध्या बरेच पेरू मिळतात. खुप दिवसांनी पेरूचं लोणचं करायला घेतलय. रेसिपी देत आहे. रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.
साहित्य:
कृती:
१) एका कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून त्यात मेथीदाणे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा.
२) पेरूच्या फोडी घालून मिश्रण एकत्र करून घ्या. त्यात लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
३) पातेल्यावर घट्ट झाकण ठेवा. झाकणावर थोडे पाणी घालून मिश्रण मध्यम आंचेवर ३-४ मिनिटे शिजवावे. पेरूच्या फोडी शिजत आल्यावर गुळ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. १-२ मिनिटे परता व गॅस बंद करा.
४) पेरूच लोणचं फ्रिझमध्ये ठेवावे.

- २ वाट्या अर्धवट पिकलेले पेरूचे तुकडे (पेरूच्या बिया काढून पेरूच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. )
- १/४ चमचा मेथीदाणे
- २ टीस्पून चिरलेला गूळ
- १/२ टीस्पून लाल तिखट
- १ टेबलस्पून तेल
- थोडीशी मोहरी, हिंग व हळद
- चवीनुसार मीठ
कृती:
१) एका कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून त्यात मेथीदाणे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा.
२) पेरूच्या फोडी घालून मिश्रण एकत्र करून घ्या. त्यात लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
३) पातेल्यावर घट्ट झाकण ठेवा. झाकणावर थोडे पाणी घालून मिश्रण मध्यम आंचेवर ३-४ मिनिटे शिजवावे. पेरूच्या फोडी शिजत आल्यावर गुळ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. १-२ मिनिटे परता व गॅस बंद करा.
४) पेरूच लोणचं फ्रिझमध्ये ठेवावे.
Comments
Post a Comment