पनीर पराठा

साहित्य:

सारणासाठी:
  • २०० ग्रॅम किसलेले पनीर
  • १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १/२ टीस्पून मिरपूड
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १ टीस्पून मॅगी मॅजिक मसाला
  • मीठ चवीनुसार

कव्हरकरिता:

  • २ वाट्या गव्हाचे पीठ
  • थोडेसे मीठ
  • तेल आवश्यकतेनुसार
  • पाणी आवश्यकतेनुसार

कृती:

१) गव्हाचे पीठ, मीठ व तेल घालून भिजवून घ्या. (मी थोडी सैलसर भिजवते.)

२) किसलेले पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरपूड, लाल तिखट, मॅगी मॅजिक मसाला व मीठ चवीनुसार घालून सारण सारखे करून घ्या.

३) कणिकेचा लहान गोळा घेऊन त्याची खोलगट वाटी करून त्यात सारण भरून वाटी बंद करून त्याची थोडी जाडसर पोळी लाटा.

४) मध्यम आंचेवर तवा तापत ठेवा. दोन्ही बाजूंनी पराठा शेका. पराठा शेकतांना तूप किंवा बटर लावून शेेका.

५ ) गरमागरम पनीर पराठा टोमॅटो केचप किंवा दह्याबरोबर सर्व्ह करा. 


Comments

Post a Comment

Popular Posts