फ्लाॅवर-बटाटा रस्सा

साहित्य:

  • २ वाट्या फ्लॉवरचे तुरे
  • १ वाटी बटाट्याचे तुकडे 
  • १ चिरलेला टोमॅटो 
  • १ चिरलेला कांदा 
  • १/२ इंच आल्याचा तुकडा 
  • ५-६ लसुण पाकळ्या 
  • १ टेबलस्पून गुळ 
  • १ चमचा धनेपुड
  • १/४ टी स्पून जिरं पावडर 
  • १/२ टी स्पून लाल तिखट 
  • १/२ टी स्पून गोडा मसाला 
  • १/२ चमचा कांदा लसूण मसाला 
  • १ टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट 
  • १/४ वाटी तेल 
  • फोडणीसाठी १/४ चमचा मोहरी, १/४ चमचा हळद व चिमुटभर हिंग 
  • मीठ चवीनुसार 

कृती:

१) एका कढईत/पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी, हळद व चिमुटभर हिंग घालून फोडणी करा. त्यात चिरलेला कांदा घालून १-२ मिनिटे परता. कांदा परतून झाल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो घालून २-३ मिनिटे परता. त्यात चिरलेला बटाटा व फ्लाॅवर घालून परता व २ वाट्या पाणी घालून मिश्रण शिजवत ठेवा. (आवडत असल्यास १/२ वाटी मटार व १/२ वाटी गाजराचेे तुुकडे 
घालु शकता.)

२) रस्सा उकळु लागल्यावर त्यात धनेपुड, जिरं पावडर, लाल तिखट, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, शेंगदाण्याचं कूट व चवीनुसार मीठ घाला. आवश्यकतेनुसार पुन्हा थोडे पाणी घालावे.

३) फ्लाॅवर व बटाट्याच्या फोडी शिजत आल्यावर त्यात आलं व लसुण पाकळ्या ठेचून घाला. नंतर गुुुळ घालून ढवळा. एक उकळी 
आली  की गॅस बंद करा व गरमागरम रस्सा सर्व्ह करा. 



Comments

Popular Posts